Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या फेऱ्या, वेळेत सोमवारपासून वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 05:49 IST

वाढत असल्याने मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या मेट्रोच्या २०० फेऱ्या होत असून, साेमवारपासून  हा आकडा २३० होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर  या मार्गावरील मेट्रोच्या फेऱ्या व  वेळेत सोमवारपासून वाढ केली जाणार आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या मेट्रोच्या २०० फेऱ्या होत असून, साेमवारपासून  हा आकडा २३० होण्याची शक्यता आहे. आता मेट्रो प्रवाशी संख्या ७० हजारांच्या आसपास गेली आहे. त्यामुळे स्थानकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून प्रवेशद्वारांची संख्याही वाढविली जाणार आहे. १८ जानेवारीपासून  सेवेचे तासही वाढविले जातील. त्यानुसार, वर्सोवा येथून पहिली मेट्रो सकाळी ७.५० वाजता तर घाटकोपर येथून सकाळी ८.१५ वाजता धावेल. घाटकोपर येथून शेवटची मेट्रो १०.१५ , तर वर्सोवा येथून ९.५० वाजता धावेल. 

टॅग्स :मेट्रो