Join us

मेट्रो ठेकेदार ‘जे. कुमार’ला दंड; वेल्डिंग काम करताना दाखवलेल्या निष्काळजीपणाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:55 IST

जे कुमार इन्फ्राला पाच लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या कामादरम्यान वेल्डिंग काम करताना दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे आगीचा मोठा लोळ खालून जाणाऱ्या वाहनांवर पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएने ठेकेदार जे कुमार इन्फ्राला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे वृत्त आहे.

मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका आणि स्टेशन आदींचे काम एमएमआरडीएने जे कुमार इन्फ्राला दिले. या कामादरम्यान मीरा रोडच्या सर्वोदय संकुलाजवळ वेल्डिंग करत असताना आगीच्या ठिणग्या पडत होत्या. खालून पादचारी तसेच दुचाकीस्वार व अन्य वाहनचालक जात असताना वरून ठिणग्या खाली पडत होत्या. तसेच एकदा तर आगीचा मोठा लोळ खाली पडला. खालून जाणाऱ्या मिनी टेम्पो ट्रॅव्हलरवर पडून नंतर तो रस्त्यावर पडला. या घटनेचा व्हिडीओव्हायरल होऊन एमएमआरडीए आणि ठेकेदार यांच्या बेजबाबदार कारभारावर टीकेची झोड उठली.

English
हिंदी सारांश
Web Title : Metro Contractor J. Kumar Fined for Negligent Welding Work

Web Summary : J. Kumar Infra fined ₹5 lakhs by MMRDA after welding sparks fell on vehicles during Mira Bhayandar metro work. A video showing the incident went viral, sparking criticism of the contractor's negligence and endangering commuters.
टॅग्स :मुंबईमेट्रो