लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 07:08 IST2025-11-01T07:07:44+5:302025-11-01T07:08:24+5:30
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक

लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई : लोकलच्या तिन्ही मार्गावर विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक असल्याने मशीद, रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट करी रोडला लोकल थांबणार नाही. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
असा असेल ब्लॉक
मध्य रेल्वे ब्लॉक विभाग - सीएसएमटी - विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कालावधी - सकाळी १०:५५ ते ३:५५
परिणाम - मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोडला लोकल थांबणार नाही
पश्चिम रेल्वे
ब्लॉक विभाग - चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्ग
कालावधी - सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५
परिणाम - चर्चगेटकडे येणाऱ्या काही लोकल दादर आणि वांद्रे स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट/रिवर्स करण्यात येतील.
हार्बर मार्ग
ब्लॉक विभाग - कुर्ला आणि वाशी अप व डाउन मार्गावर
कालावधी - सकाळी ११:१० ते दुपारी ४:१०
परिणाम - सीएसएमटी - वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारा डाउन हार्बर मार्ग बंद असेल.
उपाय - ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - कुर्ला, पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यान प्रवासाची परवानगी.