Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 02:53 IST

मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल.ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला- वाशी, पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल, तर मध्य, ट्रान्स हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.

त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल.ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील. हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला- वाशी दोन्ही दिशेकडे रविवार, १५ मार्च रोजी सकाळी १०.३४ ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी, सीएसएमटी ते वाशी/नेरूळ/पनवेललोकल रद्द करण्यात येतील, तर सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेल ते सीएसएमटी दरम्यान एकही लोकलधावणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील.

टॅग्स :रेल्वेपश्चिम रेल्वेहार्बर रेल्वे