देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 08:52 AM2024-01-20T08:52:47+5:302024-01-20T08:58:40+5:30

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी, २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Megablock tomorrow on Central and Harbor Railway for maintenance work! | देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक!

देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक!

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी, २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वे 
कुठे : मुलुंड - माटुंगा अप जलद मार्गावर. कधी : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत
परिणाम : सकाळी १०:५० ते दुपारी ३:४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि त्यांच्या स्थानकांनुसार थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. परिणामी आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वे 
कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर 
कधी : सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल तसेच वाशीदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Web Title: Megablock tomorrow on Central and Harbor Railway for maintenance work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.