Sunday Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर अंशत: बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 06:16 IST2019-12-21T05:55:54+5:302019-12-21T06:16:47+5:30
Mumbai train update : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्र्गावर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल.

Sunday Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर अंशत: बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्र्गावर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात हार्बरवरील काही मार्गांवर लोकल सेवा बंद राहील.
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड, तसेच कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात सीएसएमटीहून सुटणाºया जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून धावतील.
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भार्इंदर या स्थानकांदरम्यान, रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाºया धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकवेळी धीम्या मार्गावरील लोकल गोरेगाव/बोरीवली ते वसई रोड यादरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी/वांद्रे दिशेकडे रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत चुनाभट्टी/वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया, तसेच सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी/वडाळा रोडहून वाशी/बेलापूर/पनवेल जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगाव दिशेकडे, तसेच सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटीकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. ब्लॉककाळात प्र्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-कुर्ला या मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील.