Join us

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 06:36 IST

पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गांवर ब्लॉक असेल.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणेदरम्यान जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर ते वसई रोडदरम्यान जलद मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे - सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५०पर्यंत ब्लॉक असेल. या काळात कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाºया जलद लोकल ठाणे स्थानकापर्यंत धिम्या मार्गावर धावतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गांवर ब्लॉक असेल. या काळात चर्चगेट दिशेकडील लोकल विरार/वसई रोडहून भाईंदर/ बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावर धावतील. सीएसएमट/ वडाळा रोडहून पनवेलकडे सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत तर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टी/वांद्रेकडे लोकल धावणार नाही. सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत चुनाभट्टी/वांद्रेहून सीएसएमटीकडे तर, सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ पर्यंत सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावकडे लोकल धावणार नाही. सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी लोकल नसेल. सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत वांद्रे/गोरेगावहून सीएसएमटीकडे जाणाºया लोकलही रद्द केल्या आहेत.

टॅग्स :लोकलरेल्वे