Join us

मध्य, हार्बरवर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या, कुठे आणि कधी असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 12:06 IST

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते अंधेरी अप आणि डाऊन जलद मार्गावर आज, रविवारी रात्री मेगाब्लॉक असेल.

मुंबई : रेल्वेमार्गाची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी आज, रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते अंधेरी अप आणि डाऊन जलद मार्गावर आज, रविवारी रात्री मेगाब्लॉक असेल.

मध्य रेल्वेकुठे - माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी - सकाळी ११. ०५ ते दुपारी ३. ५५  वाजेपर्यंत परिणाम - या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. नंतर संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच ठाण्याहून अप जलद सेवा मुलुंड-माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर रेल्वेकुठे - वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन हार्बर मार्गावरकधी - सकाळी ११ ते सायंकाळी ४  पर्यंतपरिणाम - ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.  सीएसएमटी आणि  वांद्रे/गोरेगाव दरम्यान लोकल वेळापत्रकानुसार चालतील. हार्बरच्या प्रवाशांना ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर/मुख्य मार्गावर प्रवासाची परवानगी दिली आहे. 

टॅग्स :लोकलभारतीय रेल्वेरेल्वे