Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी तीनही मार्गांवर 'मेगाब्लॉक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 06:40 IST

कोणत्या मार्गावर किती वेळ ट्रेन बंद असणार.. वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, १४ जानेवारी रोजी तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद  मार्गावर
  • कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत
  • परिणाम : या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या  मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर बोरिवली आणि अंधेरीकडे जाणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. तर काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द राहतील.

हार्बर रेल्वे

  • कुठे : वडाळा रोड ते मानखुर्द अप- डाऊन हार्बर मार्गावर
  • कधी : रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
  • परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/ पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा, वाशी/बेलापूर/ पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटीअप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

मध्य रेल्वे

  • कुठे : ठाणे- कल्याण पाचव्या सहाव्या अप - डाऊन जलद मार्गावर 
  • कधी : शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४० वाजेपर्यंत
  • परिणाम : या ब्लॉकदरम्यान सहाव्या मार्गावर धावणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा आणि विद्याविहार दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर पाचव्या मार्गावर चालणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार आणि दिवा/कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच दोन्ही दिशेने निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
टॅग्स :मुंबई लोकलरेल्वे