मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 08:12 IST2021-02-06T08:12:14+5:302021-02-06T08:12:38+5:30

Megablock UPdate : देखभाल व दुरुस्ती कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ७ फेब्रुवारी राेजी मेगाब्लॉक असेल. त्यानुसार, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.०५ यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. 

Megablock on the Central, Harbor railway line | मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई - देखभाल व दुरुस्ती कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ७ फेब्रुवारी राेजी मेगाब्लॉक असेल. त्यानुसार, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.०५ यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. 
  सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. 

Web Title: Megablock on the Central, Harbor railway line