मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ट्रान्स हार्बरवर काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 07:57 IST2025-10-25T07:56:48+5:302025-10-25T07:57:41+5:30
मुख्य व ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम होईल.

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ट्रान्स हार्बरवर काय होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, २६ ऑक्टोबर रोजी माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे मुख्य व ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम होईल.
मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी आणि ठाणेदरम्यान धावणाऱ्या जलद लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. परिणामी त्यांना १५ मिनिटांचा उशीर होईल.
ट्रान्स हार्बरवर काय होणार
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाळी तसेच नेरुळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून दुपारी ४ वाजून १० मिनीटांपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे ठाण, वाशी, नेरुळ, पनवेलदरम्यान धावणऱ्या लोकल १०.२५ ते ४.०९ दरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.