Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्या प्रवाशांचा खोळंबा ठरलेलाच, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 09:14 IST

रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने उपनगरीय वाहतुकीवर परिणाम होणार आहे. 

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी, १२ मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने उपनगरीय वाहतुकीवर परिणाम होणार आहे. 

मध्य रेल्वेकधी ?: सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंतकुठे ?: माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गपरिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून स. १०.५० ते दु. ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा  धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. 

हार्बर रेल्वेकधी ?: सकाळी ११.४० ते सायं. ४.४० पर्यंतकुठे ?: सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे डाउन आणि अप मार्गावरपरिणाम : सीएसएमटी/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/ बेलापूर/ पनवेलकरिता सुटणारी आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत डाउन हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील.  प्रवाशांना ब्लॉक कालावधीत १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

‘परे’वर आज रात्रकालीन विशेष ब्लॉकअंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले पुलाच्या शेवटच्या टप्प्यातील पाडकाम करण्यासाठी आज, शनिवारी रात्री आठ तासांचा विशेष ब्लॉक पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे रात्री ११.१५ वाजता विरार स्थानकातून चर्चगेटसाठी शेवटची जलद लोकल धावणार आहे. बोरिवलीहून चर्चगेटकरिता शेवटची धिमी लोकल रात्री ११वाजून ३४ मिनिटांनी चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द असणार आहे, तर मेल- एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांवर परिणाम पडणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून गोखले पुलाचे पाडकाम सुरू आहे. पुुलावरील शेवटचे गर्डर हटवण्यासाठी पाचवी मार्गिका आणि फलाट क्रमांक ९ वरील रेल्वे मार्गिकांवर शनिवारी रात्री ९ ते रविवारी पहाटे ५. ३० वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

या ब्लॉकदरम्यान शनिवारी रात्री १२.१० ते रविवारी पहाटे ४.४० पर्यंत फलाट क्रमांक ४ वरील अप धिमी आणि अप-डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. धिम्या आणि जलद मार्गावरील ब्लॉकमुळे काही अप लोकल फेऱ्या गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.

टॅग्स :रेल्वेमुंबई