उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम, मध्य, हार्बरवर कुठे अन् कधी असेल? पाहा, सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:46 IST2025-08-02T12:45:28+5:302025-08-02T12:46:21+5:30
रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, तसेच हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम, मध्य, हार्बरवर कुठे अन् कधी असेल? पाहा, सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, तसेच हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर, तर कुर्ला आणि वाशीदरम्यान अप-डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गांवरही मेगाब्लॉक असेल.
असा असे मेगाब्लॉक
कुठे - माटुंगा - मुलुंड, अप /डाऊन जलद मार्ग
कालावधी - सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५
परिणाम - दोन्ही दिशेच्या लोकल माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविल्या जाणार असून, १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला-वाशी, अप/डाऊन जलद मार्ग
कालावधी : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५
परिणाम : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - वाशी/बेलापूर/पनवेल हार्बर मार्गांवरील ट्रेन रद्द राहतील.
सुविधा : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार असून, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ६ वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप/डाऊन जलद मार्ग
कालावधी : सकाळी १:३५ ते दुपारी ३:३५
परिणाम : चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून, काही लोकल वांद्रे, दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत.