मध्य रेल्वेवर रविवारी प्रवाशांचा ‘खोळंबा’; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 06:43 IST2024-12-28T06:43:17+5:302024-12-28T06:43:29+5:30

रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’

Mega block for maintenance and repair work on Central Railway on Sunday | मध्य रेल्वेवर रविवारी प्रवाशांचा ‘खोळंबा’; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवर रविवारी प्रवाशांचा ‘खोळंबा’; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’होणार आहे. 

रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३:३० या कालावधीत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन धिम्या सेवा विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 

सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्टलाईन वगळून अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेलवरून ठाण्याकडे जाणाऱ्या अप आणि ठाण्यावरून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. यासोबतच बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.
 

Web Title: Mega block for maintenance and repair work on Central Railway on Sunday