तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 02:40 IST2025-05-17T02:40:04+5:302025-05-17T02:40:49+5:30

मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

mega block day on sunday 18 may 2025 in mumbai western central and harbour railway on all three lines | तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यामध्ये मध्य रेल्वेच्या ठाणे- कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ०३:४० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ९:३४ ते दुपारी ३:०३ पर्यंत सुटणाऱ्या अप आणि डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तसेच सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तर अप मेल/एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर वडाळा रोड - मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात यादरम्यानच्या फेऱ्या बंद राहतील. या काळात पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जातील. या काळात हार्बरवरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ४:३० पर्यंत ट्रान्स हार्बर लाइन व मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि भाईंदर दरम्यान शनिवारी मध्यरात्री १२:३० ते रविवारी पहाटे ४ पर्यंत मेगा ब्लॉक आहे. या कालावधीत विरार/ वसई आणि बोरीवली/भाईंदरदरम्यान धिम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील.

 

Web Title: mega block day on sunday 18 may 2025 in mumbai western central and harbour railway on all three lines