Join us

प्राध्यापकांच्या समस्या सोडवण्याबाबत बैठक, एमफुक्टो संपावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 05:34 IST

सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई  - सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि राज्यभरातील प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. यासाठी प्रमुख संघटनांना बोलाविण्यात आले असले तरी बेमुदत संपावर ठाम असल्याची माहिती एमफुक्टोचे मधू परांजपे यांनी दिली.बैठकीत उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाºयाची रिक्त पदांची भरती; राज्यभरात नव्याने लागू झालेल्या विद्यापीठ कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या विद्यापीठीय अधिकाºयांच्या नियुक्त्या आदी काही मागण्यांसोबतच बहिष्कार आंदोलनाचे ७१ दिवसांचे रोखलेले वेतन या मुद्द्यावर चर्चा होईल. प्राध्यापकांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा विषयही मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उच्च शिक्षण क्षेत्रातील तसेच प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागून अभियानाला यश येईल, अशी शक्यता मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेने (मुक्ता) केली आहे. Þप्रत्येक वेळेस सामूहिक रजा, बेमुदत आंदोलन, परीक्षा बहिष्कार अशा आत्मघातकी प्रकाराला शिक्षकांनी बळी पडून आपलेच नुकसान करू नये, विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये. बेमुदत आंदोलन हा शेवटचा पर्याय असतो. शिक्षकांनी कोणत्याही प्रकाराला बळी पडून स्वत:चे नुकसान करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.प्रहार संघटनेचा विरोधएमफुक्टो या शिक्षक संघटनेचे आंदोलन हा दिखावा आहे. त्यांची खरी मागणी बिगर नेट सेट नियुक्त्यांना संपाच्या माध्यमातून शासनातील काही अधिकाºयांना हाताशी धरून, शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीर नियुक्त्यांना वेतन आयोगाचे लाभ देण्याचा खटाटोप असल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटना व नेट सेटधारक शिक्षक संघटनेने केला आहे. 

टॅग्स :शिक्षकबातम्या