उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महापौर पदाबद्दल भाजपाकडे आग्रह केला जात असल्याची चर्चा असून, भाजपाकडूनमहापौरपदाबद्दल तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा मुद्दा दिल्लीत पोहोचला आहे. मंगळवारी रात्री उशिरा मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची बैठक झाली.
गेल्या तीन-चार दिवसांत मुंबईतील राजकारणाला वेगळंच वळण मिळाले. निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाचा महापौर बनणार असे चित्र असतानाच शिंदेसेनेचे नगरसेवक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्यातून शिंदेंकडून भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मुंबई महापालिकेतील सत्तावाटपाच्या वाटाघाटींचा मुद्दा आता दिल्लीत पोहोचला आहे.
महापौर, समित्यांचा मुद्दा
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी त्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर अमित साटम आणि शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची बैठक झाली. राहुल शेवाळे यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली.
या बैठकीत महापौर, मुंबई पालिकेच्या विविध समित्या आणि त्यांच्या वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत राहुल शेवाळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना अमित साटम म्हणाले की, "तडजोड करण्यासंदर्भात काही विषयच नाही. भाजपा-शिवसेना महायुतीचे ११८ नगरसेवक निवडून आलेले असल्यामुळे महायुतीचाच महापौर, मुंबई महापालिकेवर विराजमान होईल. भाजपाचा होईल किंवा शिवसेनेचा होईल, हे महत्त्वाचे नाही", असे विधान त्यांनी केले.
Web Summary : Discussions intensify in Delhi regarding Mumbai's mayoral position. Amit Satam and Rahul Shewale met to discuss power-sharing, committees, and potential compromises. BJP insists on a mayor from their alliance.
Web Summary : मुंबई के महापौर पद को लेकर दिल्ली में चर्चा तेज। अमित साटम और राहुल शेवाले ने सत्ता-साझेदारी, समितियों और संभावित समझौतों पर चर्चा की। बीजेपी गठबंधन से महापौर बनाने पर अड़ी।