वैद्यकीय उपकरणांचा आता औषधांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:44 AM2020-02-24T03:44:42+5:302020-02-24T06:54:51+5:30

आरोग्य मंत्रालयाकडून सूचना जारी; १ एप्रिलपासून बदल लागू होणार

Medical devices are now included in the list of medicines | वैद्यकीय उपकरणांचा आता औषधांच्या यादीत समावेश

वैद्यकीय उपकरणांचा आता औषधांच्या यादीत समावेश

Next

मुंबई : देशभरातील सर्व वैद्यकीय उपकरणे आता औषधांतर्गत सूचित केली जाणार आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या नवीन सूचनेनुसार १ एप्रिल २०२० पासून देशात विक्री होणारे प्रत्येक वैद्यकीय उपकरण हे औषधाअंतर्गत असेल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून नुकतीच ही सूचना जारी करण्यात आली आहे.

आता प्रत्येक वैद्यकीय उपकरण ड्रग्स अ‍ॅण्ड कॉस्मेटिक्स कायदा १९४०च्या अंतर्गत येणार आहे. सरकारने या सर्व वैद्यकीय उपकरणांची यादी जारी केली आहे. यात वैद्यकीय इम्प्लांट, सीटी स्कॅन, एमआरआय उपकरण, डिफायब्रिलेटर, डायलिसिस मशीन, पीईटी उपकरण, एक्स-रे मशीन यांचा समावेश करण्यात आला आहे. ड्रग्स अ‍ॅण्ड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम-३ नुसार हा बदल करण्यात आला असून १ एप्रिल २०२० पासून हे बदल लागू होतील.

मनुष्य व प्राणी यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय उपकरणांचा या औषधांमध्ये समावेश करण्यात आला आहे. ड्रग्स टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डाशी चर्चा करून आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. उपकरणांची गुणवत्ता आणि रुग्णांची सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. सध्या केवळ २३ वैद्यकीय उपकरणे ड्रग्ज अ‍ॅण्ड कायद्याच्या नियंत्रणाखाली येतात. मात्र याबाबत अधिसूचना जारी झाल्यानंतर या वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, आयात, विक्री यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून प्रमाणित होणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे आजाराचे निदान, प्रतिबंध, उपचार, चाचण्या, बदलांच्या प्रक्रिया यासाठी स्वतंत्रपणे किंवा इतर उपकरणांच्या जोडीला वापरण्यात येणारी सर्व उपकरणे यांना हा नियम लागू असेल. यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादकाला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने स्थापन केलेल्या ‘वैद्यकीय उपकरणांसाठी ऑनलाइन सिस्टीम’वर नोंदणीसाठी त्या वैद्यकीय उपकरणांशी संबंधित माहिती अपलोड करावी लागणार आहे.

अ‍ॅडव्हायजरी बोर्डाशी चर्चा
मनुष्य व प्राणी यांच्यासाठी वापरल्या जाणाºया सर्व वैद्यकीय उपकरणांचा या औषधांमध्ये समावेश करण्यात आला आहे. ड्रग्स टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डाशी चर्चा करून आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Medical devices are now included in the list of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.