विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 02:50 AM2020-11-07T02:50:54+5:302020-11-07T06:35:18+5:30

legislative assembly : लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते. भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते.

Measure leaning towards Shiv Sena in Legislative Committees; Mungantiwar Chairman of the Working Advisory Committee | विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष

विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष

Next

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित १६ समित्यांपैकी सात समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेला, पाच समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर चार समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे.
लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते. भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक यांच्या अहवालांची तपासणी करणे हे महत्त्वाचे काम समिती करते.

 अध्यक्ष    समितीचे नाव    पक्ष
सुधीर मुनगंटीवार    लोकलेखा समिती    भाजप
मनोहर चंद्रिकापुरे    रोजगार हमी समिती    राष्ट्रवादी
संजय रायमूलकर    पंचायत राज समिती    शिवसेना
अशोक पवार    सार्वजनिक उपक्रम समिती    राष्ट्रवादी
कैलाश गोरंट्याल    आश्वासन समिती    काँग्रेस
रणजित कांबळे    अंदाज समिती    काँग्रेस
प्रणिती शिंदे    अनुसूचित जाती कल्याण समिती    काँग्रेस
दौलत दरोडा    अनुसूचित जमाती कल्याण समिती    राष्ट्रवादी
मंगेश कुडाळकर    इतर मागासवर्ग कल्याण समिती    शिवसेना
शांताराम मोरे    भटक्या विमुक्त जाती कल्याण समिती    शिवसेना
अमिन पटेल    अल्पसंख्यांक कल्याण समिती    काँग्रेस
चेतन तुपे    मराठी भाषा समिती    राष्ट्रवादी
दीपक केसरकर    हक्कभंग समिती    शिवसेना
आशिष जयस्वाल    उपविधान समिती    अपक्ष 
        (शिवसेना 
        सहयोगी)
नरेंद्र भोंडेकर    अशासकीय ठराव समिती    अपक्ष 
        (शिवसेना 
        सहयोगी)
राजन साळवी    आहार व्यवस्था समिती    शिवसेना
सरोज अहिरे    महिला हक्क समिती    राष्ट्रवादी

Web Title: Measure leaning towards Shiv Sena in Legislative Committees; Mungantiwar Chairman of the Working Advisory Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.