Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना माझी श्रद्धा दिसली नाही का, बोलताना मर्यादा पाळा: महापौर रितू तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 06:07 IST

महिलांबद्दल अशा पद्धतीने बोलणे अयोग्य आहे, असेही त्यांनी सुनावले.

मुंबई : जैन आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आपली घशाची व्याधी बरी झाल्याचे महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य आणि त्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून व्यथित झालेल्या तावडे यांनी 'विरोधकांना माझी श्रद्धा दिसली नाही का?' असा सवाल करत माझ्या विधानावर केली गेलेली टीका ही खोटी, अपमानास्पद आणि अत्यंत लाजिरवाणी आहे,' अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.

बोरीवलीतील एका कार्यक्रमात बोलताना, जैन महाराजांच्या मार्गदर्शनामुळे माझी घशाची व्याधी दूर झाली, असे विधान तावडे यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी बोचरी टीका केली होती. त्यावरून महापौर कमालीच्या उद्विग्न झाल्या. 'जैन महाराजांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत, ती विरोधकांना दिसली नाहीत का? माझी श्रद्धा दिसली नाही का? असा सवाल करत माझ्यावर केलेले आरोप-टीका अपमानास्पद आणि लाजिरवाणे आहे,' असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

संजय राऊत यांनी बोलताना मर्यादा पाळायला हव्यात. महिलांबद्दल अशा पद्धतीने बोलणे अयोग्य आहे, असेही त्यांनी सुनावले. या वादात पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही उडी घेतली. प्रत्येक भाषणानंतर महापौरांना सारवासारव करावी लागत आहे, असे त्या म्हणाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mayor Ritu Tawde upset over criticism, questions opposition's insensitivity.

Web Summary : Mayor Ritu Tawde expressed anguish over criticism regarding her faith in a Jain guru who helped cure her ailment. She questioned the opposition's insensitivity, deeming the remarks insulting and inappropriate, especially against women. Opposition leader Kishori Pednekar criticized Tawde's need for constant damage control.
टॅग्स :रितू तावडेसंजय राऊत