Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, ठाकरे बंधुंनी कामाता अडथळा आणू नये: अमृता फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 05:51 IST

ठाणे : मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात केले. भाजपला भरभरून मतदान करून ...

ठाणे : मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात केले. भाजपला भरभरून मतदान करून प्रगतीचे राजकारण जनतेने स्वीकारले आहे. जात, प्रांतावरून लोकांची विभागणी करणाऱ्या पक्षांना जनतेने व्होटआऊट केले आहे. आता खूप मोठी जबाबदारी महायुतीकडे आल्याचे त्या म्हणाल्या. 

जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, श्रीक्षेत्र नाणीजधाम पीठाचे पीठाधीश्वर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त स्वागत समारंभ झाला. कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळ्याला फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, सामान्य माणसाचे जीवन सुखद व्हावे यासाठी महायुती काम करणार आहे. ठाकरे बंधू हे विरोधात असतील तर त्यांनी लोककल्याणाच्या कामात अडथळे आणू नये, असेही त्या म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Mayor should be Hindu Marathi; Thackeray brothers shouldn't obstruct: Fadnavis

Web Summary : Amruta Fadnavis stated in Thane that Mumbai's mayor should be a Hindu Marathi. She urged the Thackeray brothers not to obstruct public welfare works if in opposition, emphasizing the Mahayuti's commitment to improving citizens' lives.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६अमृता फडणवीस