Join us

माझ्या नादाला लागू नका!, महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 13:56 IST

Mayor Kishori Pednekar : भायखळा पोलिस ठाण्याचे पोलिस महापौर बंगला येथे दखल

मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र महापौर बंगला येथे आले आहे. हे पत्र नवी मुंबईहून आले होते. पेडणेकर यांच्या कुटूंबियांना देखील धमकी देण्यात आली आहे. याबाबत भायखळा पोलिस अधिक तपास करत आहेत.  

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र बंगल्यावरआले, या पत्रात अश्लील भाषेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून माझ्या दादांच्या नादाला लागू नका आणि घरच्यांनाही गोळ्या घालून मारू अशी धमकी देण्यात आली आहे, अशी धमकी देण्यात आली आहे. 

महापौर किशोरी पेडणकेर यांच्या तक्रारीवरून भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. गुरुवारी आशिष शेलार यांचा जबाब नोंदवून एक लाख रुपयांवर त्यांना टेबल जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरळीतील सिलिंडर स्फोटानंतर महापौरांवर आरोप करतेवेळी आशिष शेलारांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यामुळे नव्या वादात भर पडली. बुधवारी रात्री पेडणेकर यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :किशोरी पेडणेकरमहापौरपोलिस