१६ मे रोजी राज्यात असतील ७.११ लाख सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:27 AM2021-05-07T05:27:47+5:302021-05-07T05:28:11+5:30

रुग्णसंख्या वाढण्याच्या प्रमाणावर नियंत्रण येण्याची अपेक्षा

As on May 16, there will be 7.11 lakh active patients in the state | १६ मे रोजी राज्यात असतील ७.११ लाख सक्रिय रुग्ण

१६ मे रोजी राज्यात असतील ७.११ लाख सक्रिय रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १६ मे पर्यंत काहीशी कमी होईल आणि रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण नियंत्रणात आलेले असेल, असा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. रुग्ण सुविधाही वाढलेल्या असतील. सर्वंकष प्रयत्नांद्वारे हा आकडा आणखी कमी करण्याचा निर्धार विभागाने केला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनासंदर्भातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. त्यात दिलेल्या आकडेवारीनुसार, ११ मे रोजी राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख ११,७९५ इतकी असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ११ मे रोजी कोणत्या जिल्ह्यात किती सुविधा असतील याचीही आकडेवारी दिली असून मुंबई, ठाण्याला पुरेशा सुविधा दिसतात. तेथे आयसोलेशन खाटा, ऑक्सिजन खाटा, आयसीयू खाटा, व्हेंटिलेटर याबाबत कोणताही तुटवडा नाही आणि ११ मे रोजी देखील नसेल. २८ एप्रिल रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ मे  रोजी रुग्णसंख्या आणि सुविधांबाबतचा अंदाज देण्यात आला होता. तो अंदाज आणि १६ मेपर्यंतच्या अंदाजाची आकडेवारी बघता राज्यातील रुग्णसंख्या कमी होईल असे दिसते. 

१६ मे रोजीचा वर्तविलेला अंदाज 
(सक्रिय रुग्ण आणि खाटा- प्रमुख दहा जिल्हे)
जिल्हा    १६ मे रोजी     आयसोलेशन     ऑक्सिजन     आयसीयू     व्हेंटिलेटर्स
    अंदाजे रुग्ण    खाटा    खाटा    खाटा
मुंबई    २९६३८    ४४००८    १०३८०    २१२१    १२७३
ठाणे    २१७०६    १६१९४    ८७४८    २५४२    ८१९
पालघर    २३४८१    ४६१८    २८५    २१२    ५८
पुणे    १३१६९६    ३०१४५    ४९५२    १९१    १२७
सातारा    ३१९४४    १०८६७    १२७१    ३०९    ९४
नागपूर    ४०९१९    ६८७१    १३५३    १४९६    ३५९
चंद्रपूर    २६१२४    ९२४८    २२६०    ५२३    १०६
नाशिक    ७८६८६    २९६७९    ३८८२    ८५२    २०२
अहमदनगर    ३६९५२    २८२७    १०८१    २५७    ३२
सोलापूर    ३३४८५    २१९१    १६८४    १०६    ३३

राज्यातील नवीन रुग्णदर आणि मृत्यूसंख्या
महिना    रुग्णसंख्या    दैनंदिन नवीन     मृत्यू    मृत्यूदर
    रुग्ण (सरासरी)
नोव्हेंबर २०२०    १४३२६२    ४७७५    ३२४०    २.२६
डिसेंबर २०२०    १२०६८४    ३८९३    २३७०    १.९६
जानेवारी २०२१    ९२१७७    २९७३    १५६१    १.६९
फेब्रुवारी २०२१    १३१३१६    ४६९०    १०७२    ०.८२
मार्च २०२१    ६५७९१०    २१२२२    २४९५    ०.३८
एप्रिल २०२१    १७८९४०६    ५९६४७    १३८३५    ०.७७
१ ते ४ मे २०२१    २२०४३०    ५५१०८    २९२९    १.३२

(तक्त्यामध्ये दिलेली उणे संख्या ही खाटा, व्हेंटिलेटर्सची कमतरता दर्शविते तर त्या शिवायचे आकडे हे अतिरिक्त असलेली संख्या दर्शवितात. ही आकडेवारी टॉप टेन जिल्ह्यांची आहे. )

Web Title: As on May 16, there will be 7.11 lakh active patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.