मुंबईत ओला कार चालकाचं महिलेसमोर हस्तमैथुन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 15:44 IST2017-08-10T15:17:00+5:302017-08-10T15:44:15+5:30
का ओला कारच्या चालकाने कारमध्ये त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेच्या समोरच हस्तमैथुन केल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत ओला कार चालकाचं महिलेसमोर हस्तमैथुन
मुंबई, दि. 10- मुंबईमध्ये एक्स्प्रेसच्या डब्यात एका व्यक्तीचं मुलीसमोर हस्तमैथुन केल्याचं प्रकरण ताज असताना तसाच एक संतापजनक प्रकार मुंबईत घडला आहे. एका ओला कारच्या चालकाने कारमध्ये त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेच्या समोरच हस्तमैथुन केल्याचं समोर आलं आहे. या कारचालकाच्या शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. एक महिलेला मुलाखतीसाठी जाण्यासाठी तिने ओला कॅब बूक केली होती. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. पीडित महिला उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील रहिवाशी असल्याचं समजतं आहे.
मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून ही महिला परळमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी चालली होती. त्यासाठी तिने शेअरिंग ओला कार बुक केली होती. या ओला कारमध्ये पाठीमागच्या सीटवर आधीच एक महिला बसलेली असल्याने ती पुढे ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर बसली. प्रभादेवी आल्यावर मागच्या सीटवरची महिला उतरली. त्यानंतर कारचालक अरुण तिवारीने या महिलेशी गप्पा मारायला सुरुवात केली. महिलेने त्याच्या गप्पांकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याने अश्लिल इशारे करायला सुरुवात केली आणि अचानक तो तिच्यासमोर हस्तमैथुन करू लागला. यामुळे ती महिला लगेचच कारमधून उतरली. तिने आधी नोकरीसाठी मुलाखत दिली त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.
महिलेची तक्रार आल्यानंतर आम्ही तात्काळ ओला कंपनीशी संपर्क साधला आणि आरोपीची माहिती मिळविली. आरोपी तिवारी दादरमध्येच एका प्रवाशाला ड्रॉप करायला गेल्याचं समजलं. त्यामुळे कंपनीच्या मदतीने त्याचं लोकेशन ट्रेस करून त्याला पकडल्याचं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गंगाधर सोनावणे यांनी सांगितलं.
आरोपी तिवारी विरोधात आयपीसी कलम ३५४ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारीचं लग्न झालेलं असून त्याला दोन मुलं आहेत. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला १५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.