Join us

गोरेगावच्या अश्मी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 22:45 IST

ही आग नेमकी कशामुळे लागली आणि या आगीमुळे काही जीवितहानी झालीय का याबाबत अद्याप माहिती नाही. 

मुंबई - शहरातील गोरेगावच्या अश्मी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्समध्ये प्रचंड मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भयंकर असून खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. याठिकाणी आगीचे बंब आग विझवण्यासाठी आलेले आहेत. परंतु राम मंदिर रेल्वे स्थानक जवळ असल्याने याठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. 

आग लागलेल्या परिसरात ही आग केमिकलमुळे लागल्याचे बोलले जाते. तर काहींनी गॅस गोडाऊनला ही आग लागल्याचे म्हटलं आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु आगीचं रौद्ररुप पाहता मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली आणि या आगीमुळे काही जीवितहानी झालीय का याबाबत अद्याप माहिती नाही.  

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा  

टॅग्स :आग