Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : अंधेरीमध्ये फरसाणच्या दुकानात अग्नितांडव, 12 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 16:58 IST

अंधेरी पूर्व येथे साकीनाका परिसरात फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देअंधेरी : साकीनाका परिसरातील फरसाण दुकानात अग्नितांडवभानू फरसाणच्या दुकानात लागली आग 12 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : अंधेरी पूर्व येथे साकीनाका परिसरात खैरानी रोडवरील फरसाणच्या दुकानामध्ये सोमवारी (18 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लक्ष्मी नारायण मंदिराजवळील भानु फरसाण या दुकानामध्ये ही भीषण आग लागली.

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले आहे. आग लागल्यानंतर दुकानाचे छप्परदेखील कोसळून त्याखाली कर्मचारी अडकले गेले होते. 

दरम्यान, राजावाडी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत 12  मृतदेह आणण्यात आले होते. त्यानंतर जखमी किंवा मृत व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले नाही.  परंतु आम्ही डॉक्टर व कर्मचा-यांना सर्तक राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जेणेकरून जखमी अवस्थेत कुणीही आल्यास त्याच्यांवर तातडीने उपचार सुरू करता येतील.

मात्र, दुकानामध्ये लागलेल्या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

टॅग्स :आगमुंबई