मुंबईतल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग, १४ गाड्या घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 11:09 IST2020-07-11T11:05:30+5:302020-07-11T11:09:21+5:30
विशेष म्हणजे बोरिवलीतील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर हे फार मोठं असून, आगीचा स्तरही चौथ्या टप्प्यातील होता.

मुंबईतल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग, १४ गाड्या घटनास्थळी
मुंबईः बोरीवली पश्चिमेकडच्या परिसरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास बोरिवलीमधील एस.व्ही. रोडवरील प्रसिद्ध इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये आग लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. विशेष म्हणजे बोरिवलीतील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर हे फार मोठं असून, आगीचा स्तरही चौथ्या टप्प्यातील होता. त्यामुळे अग्निशामक दलाचे १४ फायर वाहन, १३ जम्बो वॉटर टँकर, २ रेस्क्यू वाहन, २ बीए वाहन आणि १ रोबोट वाहन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉपिंग सेंटर बंद असल्यानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र आगीत शॉपिंग सेंटरमधील सामानाचं मोठं नुकसान झालं.