BREAKING: ग्रँटरोड येथे २२ मजली रहिवासी इमारतीला भीषण आग, धुराचे लोटच्या लोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 10:40 IST2023-11-17T10:38:12+5:302023-11-17T10:40:03+5:30

मुंबईच्या ग्रँटरोड येथील रहिवासी इमारतीत भीषण आग लागली आहे.

Massive fire 21 storey residential building in Grantroad | BREAKING: ग्रँटरोड येथे २२ मजली रहिवासी इमारतीला भीषण आग, धुराचे लोटच्या लोट!

BREAKING: ग्रँटरोड येथे २२ मजली रहिवासी इमारतीला भीषण आग, धुराचे लोटच्या लोट!

मुंबई-

मुंबईच्या ग्रँटरोड येथील रहिवासी इमारतीत भीषण आग लागली आहे. ग्रँटरोडच्या ऑगस्ट क्रांती रोड येथील धवलगिरी नावाच्या २२ मजली इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या ११ आणि १२ मजल्यावरुन धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. अगदी दूरहूनही धुराचे लोट पाहता येत आहेत. 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून केले जात आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Web Title: Massive fire 21 storey residential building in Grantroad

टॅग्स :Mumbaiमुंबई