मॅरियट इंटरनॅशनचा नवीन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट' लाँच; कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटीसोबत करारावर स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:41 IST2025-05-23T12:39:24+5:302025-05-23T12:41:02+5:30
सिरीज बाय मॅरियट मॅरियटसाठी कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (सीएचपीएल) सोबतच्या संस्थापकीय कराराच्या माध्यमातून आपल्या पहिला ब्रँड लाँच केला आहे.

मॅरियट इंटरनॅशनचा नवीन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट' लाँच; कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटीसोबत करारावर स्वाक्षरी
मुंबई: मॅरियट इंटरनॅशनलने मध्यम व उच्च दर्जाच्या निवास विभागांसाठी नवीन कलेक्शन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट'च्या जागतिक लाँचची घोषणा केली. कंपनीकडून जगभरात निवास ऑफरिंग्ज सेवा विस्तारणे सुरू असून, सिरीज बाय मॅरियट यामुळे मॅरियट इंटरनॅशनलचा जागतिक स्तरावर विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मॅरियट बोनव्हॉय पोर्टफोलिओमध्ये सतत दर्जा व सेवा यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. सिरीज बाय मॅरियट अतिथींना अधिकाधिक ठिकाणी आरामदायी सोयी-सुविधा देईल, तसेच प्रादेशिक मालकांना मॅरियटच्या प्लॅटफॉर्म्सचे फायदे, कंपनीचा मॅरियट बोनव्हॉय लॉयल्टी प्रोग्राम उपलब्ध करून देईल. या सुविधा देताना कंपनीच्या पोर्टफोलिओची स्वतंत्र ओळख कायम राखली जाईल.
सिरीज बाय मॅरियट मॅरियटसाठी प्रमुख विकास बाजारपेठ भारतातील कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (सीएचपीएल) सोबतच्या संस्थापकीय कराराच्या माध्यमातून आपल्या पहिला ब्रँड लाँच केला आहे. परम कन्नामपिल्ली यांच्याद्वारे १९९६ मध्ये स्थापना करण्यात आलेली सीएचपीएल भारतातील आघाडीची हॉटेल मॅनेजमेंट कंपनी आहे. या कंपनीा सहा ब्रँड्सचा पोर्टफोलिओ आहे. ही कंपनी ९० ठिकाणी कार्यरत असून, १०० हून अधिक हॉटेल्स आहेत. सीएचपीएल आणि मॅरियट यांच्यामधील धोरणात्मक करारांतर्गत सीएचपीएलचे प्रमुख ब्रँड्स - द फर्न, द फर्न रेसिडन्सी व द फर्न हॅबिटॅट भारतभरात विशेष आधारावर सिरीज बाय मॅरियटशी संलग्न होतील, तसेच मॅरियट सीएचपीएलमध्ये लहान इक्विटी गुंतवणूक करेल.
द फर्न पोर्टफोलिओमध्ये सध्या ८४ खुल्या मालमत्ता आणि ३१ प्रस्तावित डिल्सचा समावेश आहे. ज्यामुळे एकूण ११५ मालमत्ता आणि जवळपास ८ हजार रूम्स आहेत. फर्न मालमत्ता थर्ड-पार्टी हॉटेल मालकांसोबत चर्चा आणि या मालकांसोबत दीर्घकालीन फ्रँचायझी करारांची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील मॅरियटच्या पोर्टफोलिओमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. बहुराष्ट्रीय समूह सीजी कॉर्प ग्लोबलचा आदरातिथ्य विभाग सीजी हॉस्पिटॅलिटी सीएचपीएलमध्ये बहुतांश भागधारक आहे.
सिरीज बाय मॅरियट योग्य ठिकाणी योग्य किमतीमध्ये मुलभूत सुविधा असलेल्या निवास ऑफरिंग्ज देण्याप्रती मॅरियटच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते, असे मॅरियट इंटरनॅशनलचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अॅन्थोनी कॅपुआनो म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आम्हाला सीएचपीएलसोबतच्या संस्थापकीय कराराच्या माध्यमातून सिरीज बाय मरियट लाँच करण्याचा आनंद होत आहे. हा करार कंपनीसाठी महत्त्वपूर्ण बाजारपेठ भारतात मॅरियटचे आघाडीचे स्थान अर्थपूर्णपणे विस्तारित करण्यास मदत करेल. जगभरातील इतर बाजारपेठांमध्ये सिरीज बाय मॅरियट कलेक्शनच्या वाढीला गती देण्यासाठी आम्ही या मल्टी-युनिट कन्व्हर्जन कराराला मजबूत पाया मानतो. संपूर्ण भारतात फर्न पोर्टफोलिओला खूप महत्त्व दिले जाते आणि सीएचपीएलची ऑपरेशनल उत्कृष्टता व प्रादेशिक प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्याची कटिबद्धतेमधून सिरीज बाय मॅरियट ब्रँडचा उत्साह दिसून येतो.