लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपरच्या कामराज नगर परिसरात एका विवाहितेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. झुडपात गळा चिरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे नाव अमिना इब्राहिम सिद्दीकी असे आहे. पंतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय आहे; मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अमिना या पती इब्राहिम सिद्दीकी आणि चार मुलांसह घाटकोपरच्या कामराज नगर येथे राहत होत्या. बुधवारी सायंकाळी अमिनाच्या नणंद त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर दोघी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत अमिना घरी न आल्याने इब्राहिम यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
कामराज नगरात झुडपात सापडला अमिनाचा मृतदेहरुवारी सकाळी कामराज नगर परिसरातील झुडपात अमिनाचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने खोल जखमा केलेल्या होत्या. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले आहेत. तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासण्यात येत आहेत.
Web Summary : A woman was brutally murdered in Ghatkopar's Kamraj Nagar. Police suspect a personal dispute. The victim, Amina Siddiqui, was found with her throat slit. Police have registered a murder case against an unknown accused and are investigating CCTV footage.
Web Summary : घाटकोपर के कामराज नगर में एक महिला की निर्मम हत्या कर दी गई। पुलिस को निजी विवाद का संदेह है। पीड़िता, अमीना सिद्दीकी, का गला कटा हुआ पाया गया। पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर सीसीटीवी फुटेज की जांच कर रही है।