सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: August 25, 2014 01:02 IST2014-08-25T01:02:59+5:302014-08-25T01:02:59+5:30

सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वाशी येथे घडली आहे.

Married to suicide in India | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नवी मुंबई : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वाशी येथे घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासू व सासऱ्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृता उदय पिंगट (२७) असे या मृत विवाहितेचे नाव आहे. ती वाशी सेक्टर ९ येथे पती, सासू व सासरे यांच्यासोबत राहत होती. सन २00७ साली तिचा उदय पिंगट याच्याशी विवाह झाला होता. विवाहनंतर तिला पहिली मुलगी झाली. त्यानंतर दुसऱ्यांदाही तिने मुलीलाच जन्म दिल्याने मुलाची अपेक्षा धरून असलेल्या सासरच्या मंडळीनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. याचदरम्यान उदय याचे बाहेर एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती तिला समजली. यासंदर्भात तिने विचारणा करण्याच्या प्रयत्न केला असता सासरच्या मंडळींनी उलट तिलाच त्रास द्यायला सुरूवात केली. या छळाला कंटाळून अखेर अमृताने घरात कोणी नसल्याची संधी साधून गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मृत अमृताच्या वडिलांनी तिचा नवरा, सासू तसेच सासऱ्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पती उदय, सासू अनुराधा आणि सासरे बाबुराव पिंगट यांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्यापी यापैकी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Married to suicide in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.