हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा

By Admin | Updated: May 20, 2014 02:54 IST2014-05-20T02:54:11+5:302014-05-20T02:54:11+5:30

हुंड्यासाठी विवाहितेचा पाच वर्षांपासून छळ केल्याच्या आरोपावरून मेघवाडी पोलिसांनी कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.

Marriage for the sake of dowry, crime against four | हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा

मुंबई : हुंड्यासाठी विवाहितेचा पाच वर्षांपासून छळ केल्याच्या आरोपावरून मेघवाडी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू-सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल केला आहे. अंधेरीच्या पंप हाऊस परिसरात ज्योती शर्मा (३३) ही पिडीत महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. २००८ मध्ये या महिलेचा महेश शर्मा (२६) याच्यासोबत विवाह झाला होता. मात्र लग्न झाल्यापासून सासरची मंडळी महिलेस माहेरुन पैसे घेऊन आणण्यासाठी छळ करत होते. कधी पतीकडून तर कधी सासू-सासर्‍यांकडून तिला मारहाण केली जात होती. रविवारीही तिला आरोपींकडून मारहाण करण्यात आली. नेहमीच होणार्‍या या जाचाला कंटाळून अखेर तिने रविवारी मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर पोलिसांनी तिचा पती महेश, सासू शशिकला (५३), सासरा प्रेमकुमार (६६) आणि दिर मनोज यांच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage for the sake of dowry, crime against four