Join us  

मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 6:37 PM

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आली

मुंबई- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आली होती. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे,शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, सायली संजीव, संजय मोने, अतुल परचुरे, पुष्कर शोत्री, आनंद इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेचा प्रसार व्हावा तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी  दरवर्षी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येते.  आपली मराठी बोली टीकावी तिचा सन्मान व्हावा म्हणून याची सुरुवात स्वाक्षरी पासून झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे माहीम विभागअध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

दोन गुजराती एकत्र आले तर ते गुजराती मध्ये बोलतात दोन कन्नड एकत्र आले तर ते कन्नड मध्ये बोलतात मग आपण देखील अन्य कुठल्या भाषे मध्ये न बोलता आपल्या मायबोलीतच बोलले पाहिजे असे किल्लेदार यांनी सांगितले.साहित्यिकांचा केला सन्मानमराठी भाषेचे औचित्य साधत मराठी भाषेसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक संगीतकार, प्रश्वगायिका व शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन मनसेने त्यांचा सन्मान केला.

ज्येष्ठ साहित्यक पंढरीनाथ तामोरे, पार्श्वगायिका पुष्पा पागधारे, संगीतकार व हार्मोनियम वादक महादेव खैरमोडे, शिक्षक रामदास केरकर, यशवंत राऊळ यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

टॅग्स :राज ठाकरेमनसेमराठी भाषा दिनमुंबई