Join us  

दुधात साखर विरघळावी तसं मराठी-गुजराती नातं; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 7:38 PM

आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहे याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जाब विचारला होता असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले होते.

मुंबई - १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे. मी देखील वृत्तपत्र चालवतो वृत्तपत्र चालवणं कठीण असतं. वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणं.  पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे. 'मुंबई समाचार'ने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) म्हटलं आहे. 

मुंबई समाचार द्विशताब्दी कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला अभिमान आहे या महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्ष पूर्ण करत आहे. हेच तर आपलं प्रेम आहे.  मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकात विरघळून गेले आहेत. मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. गुजराती आणि मराठीचे नातं अधिकाधिक दृढ व्हावं हीच माझी यानिमित्ताने सदिच्छा आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहे याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जाब विचारला होता. मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मी मुंबई समाचारला माझ्या शुभेच्छा देतो. आज त्यांना दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला. 

मुंबई समाचार हे केवळ बातम्यांचे माध्यम नाही, तर वारसा आहे - मोदीदरम्यान, परकीयांच्या प्रभावाखाली हे शहर मुंबई झाले, तेव्हाही या वृत्तपत्राने आपला स्थानिक संपर्क सोडला नाही, मुळाशी असलेला संबंध तोडला नाही. तेव्हाही ते सामान्य मुंबईकराचे वर्तमानपत्र होते आणि आजही तेच आहे. मुंबई समाचार हे केवळ बातम्यांचे माध्यम नाही, तर वारसा आहे. मुंबई समाचार हे भारताचे तत्वज्ञान आहे, भारताची अभिव्यक्ती आहे. प्रत्येक वादळानंतरही भारत कसा खंबीरपणे उभा राहिला आहे, त्याची झलक आपल्याला मुंबई समाचारमध्ये पाहायला मिळते. मुंबई समाचार सुरू झाला तेव्हा गुलामगिरीचा अंधार दाटत होता. अशा काळात गुजरातीसारख्या भारतीय भाषेत वृत्तपत्र मिळणे इतके सोपे नव्हते. मुंबई समाचारनं त्या काळात भाषिक पत्रकारितेचा विस्तार केला असं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काढले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदी