वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरु
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 30, 2025 20:28 IST2025-01-30T20:27:56+5:302025-01-30T20:28:29+5:30
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरू झाला आहे.

वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरु
मनोहर कुंभेजकर, मुंबई-अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरू झाला आहे.वर्सोवा येथील रस्त्याला प्रभाग क्रमांक ६८ चे माजी नगरसेवक रोहन राठोड आणि अंधेरीचे आमदार अमित साटम यांच्या संकल्पनतून अभिनेते स्व. रमेश देव असे नामरकण व याच परिसरात मराठी चित्रपट कट्ट्याचे लोकार्पण माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री अँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक राजदत्त, गायिका वैशाली सामंत, अभिनेते अजिंक्य देव, अभिनव देव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे. त्यामुळे हे वर्ष मराठी भाषेसाठी आनंदाचे वर्ष आहे, अशा भावना शेलार यांनी व्यक्त केल्या.
आमदार अमित साटम यांनी यावेळी कार्यक्रमाची संकल्पना मांडतानाच मराठी चित्रपट हे चित्रपट जगताचे जनक असून ही मागे पडले की काय? अशी खंत व्यक्त करीत या चित्रपट नगरीला पुन्हा तेच वैभव मिळावे यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी रमेश देव व सीमा देव यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.