हैदराबादमध्ये मराठी महाविद्यालय मोजत आहे अखेरच्या घटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 04:59 AM2020-03-01T04:59:28+5:302020-03-01T04:59:37+5:30

साहित्य संस्थेतर्फे चालविले जाणारे देशातील एकमेव महाविद्यालय अशी ओळख असलेले हैदराबाद येथील मराठी महाविद्यालय अखेरच्या घटका मोजत आहे.

Marathi college in Hyderabad is counting down to the last element | हैदराबादमध्ये मराठी महाविद्यालय मोजत आहे अखेरच्या घटका

हैदराबादमध्ये मराठी महाविद्यालय मोजत आहे अखेरच्या घटका

Next

मुंबई : साहित्य संस्थेतर्फे चालविले जाणारे देशातील एकमेव महाविद्यालय अशी ओळख असलेले हैदराबाद येथील मराठी महाविद्यालय अखेरच्या घटका मोजत आहे. या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी मराठी विषयात उस्मानिया विद्यापीठाची बी. ए.ची पदवी मिळवून पुढे यशस्वी झाले आहेत. मात्र, तेलंगणा सरकारने महाविद्यालयाला दिलेल्या स्वयंअर्थसहाय्यित दर्जामुळे आणि काढून घेतलेल्या अनुदानामुळे महाविद्यालय आर्थिक अडचणीत आहे.
दुसऱ्या राज्यात जाऊन नोकरीसाठी धडपडणाºया आणि त्यातही मराठीतून शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांसाठी हे महाविद्यालय चांगला पर्याय होता. मात्र, गेल्या दहा वर्षांत येथील मराठी विषयाचे पाच व हिंदीचा एक असे सहा प्राध्यापक निवृत्त झाले आहेत. २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयाचा गँट इन एड हा दर्जा बदलून सेल्फ फायनान्स दर्जा देण्यात आला. संपूर्ण महाविद्यालय, प्राध्यापकांचे पगार याची जबाबदारी संस्थेने घ्यावी, असे निर्देश तेलंगणाच्या उच्चशिक्षण विभागाने दिले. दरम्यान, महाविद्यालयातील इंग्रजी प्राध्यापकांची व शिपायाची सरकारी महाविद्यालयांत बदली केली असून, आता येथे एकच पूर्ण वेळ प्राध्यापक आहे. यामुळे गेल्या ७-८ वर्षांत विद्यार्थी संख्या २५० वरून आता ३५ वर आल्याची माहिती मराठी साहित्य परिषदेच्या डॉ.विद्या देवधर यांनी दिली.
तर, दुसºया एखाद्या राज्यात आपली भाषा टिकविण्यासाठी आणि तेथील मराठी भाषिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडणाºया या महाविद्यालयीन संस्कृतीचा अस्त या निमित्ताने होणार असल्याची खंत भाषाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
तेलंगण सरकारने बीएडला मराठी विषय बंद केला. त्यातच मराठी भाषिक अल्पसंख्याकांचा तेलंगणा सरकारवर दबाव नसल्याने, पुढे महाविद्यालय चालवायचे किंवा नाही, हा गंभीर प्रश्न मराठी साहित्य परिषदेपुढे आहे. यामुळेच जून, २०१९ मध्ये एंट्रन्स व बी.ए. प्रथम वर्षात नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला नाही. या संदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणे झाल्याचे देवधर यांनी सांगितले.
सामंत हे तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांची भेट घेणार असून, महाविद्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
> ... तरच मराठीची गोडी टिकून राहील
इतर राज्यांत मराठी भाषेची अशी उपेक्षा होत असेल, तर हे वाईट आहे. तेलंगणा सरकारने पुन्हा महाविद्यालयाला ग्रँट इन एड दर्जा दिल्यास महाविद्यालय जोमाने चालविण्यास आम्हाला बळ मिळेल. शिवाय साहित्य संस्थेद्वारे चालविण्यात येणाºया महाविद्यालयामुळे येथील मराठी भाषिकांत मराठीची गोडी टिकून राहील.
- डॉ. विद्या देवधर, मराठी साहित्य परिषद

Web Title: Marathi college in Hyderabad is counting down to the last element

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.