Join us

मराठा युवकांचा आता युवा क्रांती मोर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 07:35 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना एकसंध ठेवण्यासाठी मराठा क्रांती युवा मोर्चाची उभारणी करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश राणे यांनी दिली आहे.

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना एकसंध ठेवण्यासाठी मराठा क्रांती युवा मोर्चाची उभारणी करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश राणे यांनी दिली आहे. शैक्षणिक आणि रोजगाराच्या प्रश्नांवर युवा क्रांती मोर्चा काम करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राणे म्हणाले की, लवकरच यासंदर्भात मुंबईसह पुणे, नाशिक यांपैकी एका ठिकाणी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन केले जाईल. राज्यातील प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर मराठा तरुणांना एकत्रित आणले जाईल. या सर्व तरुणांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न युवा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येईल.

टॅग्स :मराठामराठा क्रांती मोर्चा