Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसापासून जरांगे यांनी आमरण उपोषण केले. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. राजकीय नेत्यांनीही जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. आज 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी सुळे यांच्यासमोर संताप व्यक्त केला.
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदानावरील आंदोलनाला भेट दिली. यावेळी आंदोलकांनी सुळे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे कारकडे जात होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा असी घोषणाबाजी केली.यावेळी आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवले.
राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसापासून जरांगे यांनी आमरण उपोषण केले. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. राज्य सरकारनेही आता आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. राजकीय नेत्यांनीही जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरुन विधान केले होते, या विधानावरुन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधताना पवार यांना प्रत्युत्तर दिले."जरांगे पाटील यांनी न्यायमूर्ती यांच्यासमोर मांडलेल्या प्रश्नांवर आज आम्ही बैठक घेतली. या मुद्द्यावर मार्ग निघावा म्हणून चर्चा करत आहे. शरद पवारांचं मला नेहमी आश्चर्य वाटतं, ते राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते. मंडल आयोग करताना त्यांच्या लक्षात का आलं नाही, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? , असा सवाल मंत्री विखे- पाटील यांनी केला.