Join us  

मुंबईच्या आझाद मैदानातील ४ फुटी वारुळाची अनेकांनी घेतली धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 1:20 PM

मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनस्थळी जातेय सर्वांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यभरातील मोर्चेकरी, आंदोलकांसाठी मुंबईत सुनिश्चित करण्यात आलेल्या आझाद मैदान आंदोलनस्थळी चार पुटीचे मोठे वारूळ दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड काळात मैदानात बंधने लादल्यानंतर हे वारूळ उभे राहिले असल्याचे बोलले जाते. मात्र, हे नेमके कोणाचे वारूळ आहे?  असा धास्तीचा प्रश्न आझाद मैदानात आल्यावर पडल्याशिवाय राहत नाही.

आझाद मैदान पश्चिम दिशेला क्रिकेट मैदानाला लागून पोलिसांसाठी एक टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. कोविड काळात मैदानात येण्यास बंधने होती. त्यामुळे या टेहळणी मनोराजवळ मोठ्या प्रमाणात रानटी झाडे आणि पान वेली वाढल्या होत्या. आजही येथे पानवेलीनी मनोरा झाकला गेला आहे. 

 या मनोऱ्याखाली हे वारूळ वाढले आहे. जवळपास चार फूट उंच हे वारूळ वाढत आहे. त्यामुळे मैदानात प्रवेश करताच कोणत्याही दिशेने ते दृष्टीत पडते. त्यामुळे येथे आंदोलन, उपोषण किंवा मोर्चासाठी येणाऱ्यांचे लक्ष या वारुळावर जाते.  पूर्वी वारुळाची उंची कमी होती. मात्र, आता उंची वाढत असल्याने हे वारूळ पाहताच धास्तीने हे वारूळ नक्की कोणाचे, असा प्रश्न येथे येणाऱ्यांना पडतो आहे.     

 

टॅग्स :मुंबईपोलिसआंदोलन