As many as 95 policemen died in four months due to coronary obstruction | कोरोनाची बाधा झाल्याने चार महिन्यांत तब्बल ९५ पोलिसांचा मृत्यू

कोरोनाची बाधा झाल्याने चार महिन्यांत तब्बल ९५ पोलिसांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल ९५ खाकीवर्दीवाल्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६४ जणांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आहे. या काळात पोलीस नाकाबंदीद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात त्यांनाही संसर्गाची लागण होत आहे.

गेल्यावर्षी मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून आजअखेर राज्यातील तब्बल ४२७ पोलीस अधिकारी, अंमलदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मार्च ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ३३२ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला, तर जानेवारीपासून २ मेपर्यंत ९५ पोलिसांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये एप्रिलमध्ये तब्बल ६४ जणांचा कोरोनामुळे जीव गेला.

nया वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत काेराेनामुळे २६ पाेलिसांचा मृत्यू झाला हाेता. मात्र सरलेल्या एप्रिलमध्ये तब्बल ६४ पाेलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुंबईसह विविध पोलीस घटकांतील ही संख्या आहे. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या २ दिवसांत ५ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला.

८८% पोलिसांचे लसीकरण
पोलीस दलातील जवळपास ८८ टक्के पाेलिसांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस सरासरी ५२ टक्के जणांनी घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या वर्षात कोरोनामुळे झालेले पोलिसांचे मृत्यू

महिना- मृत्यू
जानेवारी - १२
फेब्रुवारी - २
मार्च - १३
एप्रिल - ६४
२ मे - ५

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: As many as 95 policemen died in four months due to coronary obstruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.