Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं कुटुंबीयांसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 14:28 IST

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं मायदेशी परतल्यानंतर सोमवारी (27 नोव्हेंबर)कुटुंबीयांसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले.

मुंबई - मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं मायदेशी परतल्यानंतर सोमवारी (27 नोव्हेंबर)कुटुंबीयांसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, मानुषी जवळपास अर्धा तास मंदिरात होती व तिनं बाप्पाची आरतीदेखील केली. यावेळी तिच्यासोबत आई-वडील व छोटा भाऊदेखील होता. 

शनिवारी (25 नोव्हेंबर) उशीरा रात्री मानुषीचे मुंबई विमानतळावर तिचे आगमन झाले. यावेळी तिचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर मानुषीचे भारतीय परंपरेनुसार जोरदार स्वागत करण्यात आले. मानुषीची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनीही विमानतळावर गर्दी केली होती.   

 

17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमानभारताच्या मानुषी छिल्लरनं 'मिस वर्ल्ड 2017' चा किताब जिंकला आहे.  या स्पर्धेत 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे. यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.प्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषी म्हणाली, 'माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे.

जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा', असे तिने सांगितले. आईला कॅश सॅलरी देऊन भागणार नाही, तिचा गौरव व्हावा. तिला भरपूर प्रेम मिळायला हवे.' मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही हरियाणातील सोनीपत येथील राहणारी आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. 7 मे 1997 रोजी दिल्लीत मानुषीचा जन्म झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन असलेल्या मानुषी हिला माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासारखे बनण्याची इच्छा आहे. 

टॅग्स :मानुषी छिल्लरविश्वसुंदरीसिद्धिविनायक गणपती मंदिरमुंबई