मानखुर्द-शिवाजीनगर, चेंबूर-गोवंडीमधून; सर्वाधिक ३४६ उमेदवारी अर्ज दाखल; बोरीवलीतून सर्वांत कमी ५१ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:47 IST2026-01-01T14:44:52+5:302026-01-01T14:47:34+5:30
निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे वितरणास सुरुवात झाली. ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत ११,३९१ अर्ज वितरित झाले होते. ३० डिसेंबरला उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मानखुर्द-शिवाजीनगर, चेंबूर-गोवंडीमधून; सर्वाधिक ३४६ उमेदवारी अर्ज दाखल; बोरीवलीतून सर्वांत कमी ५१ अर्ज
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत २,५१६ अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी २,१२२ अर्ज भरण्यात आले. सर्वाधिक ३४६ अर्ज मानखुर्द-शिवाजीनगर आणि चेंबूर-गोवंडी या भागातून, तर सर्वांत कमी ५१ अर्ज बोरीवलीतून दाखल झाले आहेत.
निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे वितरणास सुरुवात झाली. ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत ११,३९१ अर्ज वितरित झाले होते. ३० डिसेंबरला उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दक्षिण मुंबईतील निवडणूक कार्यालयात काही उमेदवारांचे अर्ज उशिरा आल्यामुळे ते नाकारण्यात आले. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अर्ज भरण्याची वेळ सायंकाळी पाचपर्यंत होती. त्यामुळे जे उमेदवार पाचपर्यंत कार्यालयात आले होते, त्यांचे अर्ज दाखल करून घेण्यात आले.
सर्वाधिक अर्जांमुळे मतांची विभागणी? उमेदवारांना चिंता
सर्वाधिक अर्ज मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, देवनार या भागांतून असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मते विभागली जाण्याची शक्यता आहे, तर सर्वांत कमी अर्ज बोरीवली, दहिसर, गिरगाव, ग्रँट रोड, शिवडी, लालबाग परिसरातून दाखल झाले आहेत.
हे प्रभाग भाजप आणि शिवसेनेचे बालेकिल्ले
मानले जातात.
२ जानेवारीकडे लागले लक्ष
उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज २ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत मागे घेता येणार आहेत. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी शनिवारी, ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होणार आहे.