Join us

मानखुर्दमध्ये महिलेवर मुलांसमोरच अत्याचार; घरात घुसून दार लावलं चाकूने अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:38 IST

मानखुर्दमध्ये एका २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार

Mumbai Crime: मुंबईच्या मानखुर्दमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये एका मुलाने २७ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. हा सगळा प्रकार महिलेच्या मुलांसमोर घडला. आरोपीने चाकूचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली अ असून सध्या त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

मानखुर्दमध्ये एका २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांच्या जीवाला धोका असल्याने पीडितेने आरोपीच्या मागण्यांपुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी तातडीने कारवाई करत १८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आता आरोपी अल्पवयीन आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अधिकारी त्याच्या जन्म प्रमाणपत्राची पडताळणी करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. पीडित महिला गृहिणी असून ती तिच्या दाराशी बसली होती तर तिची दोन्ही मुले घरात होती. पीडित महिलेचा पती त्यावेळी कामावर गेला होता. आरोपी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता आणि ती घरात जाताच तिच्या मागे घरात शिरला. आत गेल्यावर त्याने दार बंद केले आणि स्वयंपाकघरातून चाकू बाहेर काढला. त्यानंतर जर आपण सांगितले तसं केले नाही तर तुला आणि तुझ्या मुलांना मारुन टाकेन अशी धमकी आरोपीने दिली.

आरोपीने महिलेचे हात बांधले आणि तिचा गळा दाबून हे घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर, त्याने घराला बाहेरून कुलूप लावले आणि घटनास्थळावरून पळून काढला. त्यानंतर महिलेने स्वतःची सुटका करून घेतली आणि मदतीसाठी ओरड केली. तिचा ओरड ऐकून शेजाऱ्यांनी दार उघडले आणि तिच्या पतीला आणि स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. महिलेल्या जबाबावरून पोलिसांनी अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

"आरोपीला पकडण्यासाठी आम्ही आठ पथके तयार केली. तो त्याच्या घरी सापडला नाही आणि त्याचा फोन बंद होता. आमच्या पथकांनी रात्रभर त्याचा शोध घेतला आणि मंगळवारी दुपारपर्यंत आम्ही त्याला परिसरातून अटक करण्यात यशस्वी झालो, असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीचे वय नेमकं किती आहे याची माहिती घेण्यासाठी त्याच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. ज्यामुळे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाईवर करता येईल. त्याचा काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही तपास केला जात आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस