मुंबई : ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे दोनच दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र त्यांच्या निधनाच्या दोनच दिवसांनंतर दादरमधील त्यांच्या घरमालकाने केलेला माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला. यशवंत देव यांच्या दादरमधील वंदन सोसायटीतील घराबाहेर घरमालकाने घर खाली करण्याची नोटीस त्यांच्या अस्थींचे विसर्जन होण्यापूर्वीच लावली. घरमालक दिलीप चौधरी आणि ओजस चौधरी यांनी पूर्वकल्पना न देताच नोटीस लावल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या असंवेदनशीलपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
माणुसकीला काळिमा! अस्थी विसर्जनाआधीच यशवंत देव यांच्या घरावर मालकाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:59 IST