मुंबई - गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती राज्य सरकारने शुक्रवारी केली. मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली. मनीषा म्हैसकर आतापर्यंत याच पदावर होत्या. आता बांधकाम खात्यातील त्यांची जागा त्यांच्या पतींनी घेतली आहे. मिलिंद म्हैसकर हे आतापर्यंत वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.
मनीषा म्हैसकर यांनी यापूर्वी माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि सार्वजनिक बाांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आदी महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे.
मिलिंद म्हैसकर यांनी यापूर्वी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे सचिव, गृहनिर्माण सचिव, म्हाडा; मुंबईचे सीईओ तसेच इतर ठिकाणी कार्य केले आहे. याशिवाय राज्य सरकारने महाबीज; अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक बुवनेश्वरी एस. यांची बदली संचालक माहिती व तंत्रज्ञान; मुंबई या पदावर तर डॉ.एच.एस.वसेकर यांची बदली एमएससीईआरटी; पुणेच्या संचालकपदी केली.
Web Summary : Manisha Patankar-Mhaiskar is the new Home Secretary, succeeding Milind Mhaiskar, who now heads Public Works. Mhaiskar previously led the Forest Department. Other transfers include Buvaneshwari S. to Director of Information Technology and Dr. H.S. Vasekar to MSCERT Director, Pune.
Web Summary : मनीषा पाटणकर-म्हैसकर नई गृह सचिव बनीं, मिलिंद म्हैसकर की जगह, जो अब लोक निर्माण विभाग के प्रमुख हैं। म्हैसकर पहले वन विभाग का नेतृत्व कर रहे थे। बुवनेश्वरी एस. को सूचना प्रौद्योगिकी निदेशक और डॉ. एच.एस. वसेकर को एमएससीईआरटी पुणे का निदेशक बनाया गया।