स्पेन, ब्राझीलचा आंबा एपीएमसीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:29 IST2020-10-27T03:54:19+5:302020-10-27T07:29:25+5:30
Spain Mango : परदेशातून आयात होणाऱ्या हा आंबा चवीला गोड असून चार किलोची पेटी साडेतीन ते चार हजार रूपयाला विकली जात आहे

स्पेन, ब्राझीलचा आंबा एपीएमसीत दाखल
नवी मुंबई : हापूसच्या सिझनला आणखी अवकाश आहे. असे असले तरी एपीएमसीच्या फळ बाजारात सध्या स्पेन आणि ब्राझीलचा आंबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.परदेशातून आयात होणाऱ्या हा आंबा चवीला गोड असून चार किलोची पेटी साडेतीन ते चार हजार रूपयाला विकली जात असल्याची माहिती एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात इराण येथून एपीएमसीत कांदा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता स्पेन आणि ब्राझीलचा आंबाही दाखल झाल्याने या परदेशी आंब्याला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल, असेही पानसरे यांनी स्पष्ट केले आहे.
स्पेन आणि ब्राझीलहून सुरूवातील आंब्याच्या पाच पेट्या आल्या होत्या. पाच किलोची ही प्रत्येक पेटी चार हजार रूपये दराने विकली गेली. त्यानंतर ४३ पेट्या आल्या. ही एक पेटी ३६00 रूपये दराने विकली जात आहे. विशेष म्हणजे या आंब्याला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे यातील काही पेट्या अद्यापी शिल्लक असल्याचे पानसरे यांनी सांगितले.