कुरार गोळीबारप्रकरणी एकाला अटक

By Admin | Updated: May 8, 2016 01:36 IST2016-05-08T01:36:35+5:302016-05-08T01:36:35+5:30

कुरार परिसरात साई डेव्हलपर्स बिल्डरच्या साइटवर एकावर केलेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. राशुतोष पांडे (वय २८) असे त्याचे नाव असून

A man was arrested in connection with the firing | कुरार गोळीबारप्रकरणी एकाला अटक

कुरार गोळीबारप्रकरणी एकाला अटक

मुंबई : कुरार परिसरात साई डेव्हलपर्स बिल्डरच्या साइटवर एकावर केलेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. राशुतोष पांडे (वय २८) असे त्याचे नाव असून, तो गुंड उदय पाठक टोळीतील असून, त्याला पालघरमध्ये सापळा रचून पकडण्यात आले.
कुरारमध्ये शिवाजीनगरात दप्तरी रोडवर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे काम करणारा तरुण, रिक्षाचालक असलेला भाऊ तारकेश्वर सिंह व अन्य दोघांबरोबर बोलत थांबले असताना, एका मोटारीतून बुरखा घालून आलेल्या तिघांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये तारकेश्वर जखमी झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: A man was arrested in connection with the firing