Join us

मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांच्या भवितव्याचा फैसला 16 जुलैला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 13:22 IST

ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला १६ जुलैला होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करावं, अशी मागणी कर्नल पुरोहित यांनी याचिकेतून केली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल १६ जुलैला सुनावण्यात येणार आहे.

मालेगावमधील २००८ मधील बॉम्बस्फोटांप्रकरणी १० वर्षांपूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. कर्नल पुरोहित यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातून दोषमुक्त करावं, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. 

टॅग्स :मालेगाव बॉम्बस्फोटमुंबई हायकोर्टउच्च न्यायालयस्फोट