Join us

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतील गैरप्रकाराची न्यायालयीन चौकशी करा - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 20:13 IST

राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा परिक्षेत मागील दोन-तीन वर्षांपासून बोगस (डमी ) विद्यार्थी बसवून निवड केली जात असल्याचे प्रकरण अतिशय गंभीर असून, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा परिक्षेत मागील दोन-तीन वर्षांपासून बोगस (डमी ) विद्यार्थी बसवून निवड केली जात असल्याचे प्रकरण अतिशय गंभीर असून, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

आज विधान परिषदेत नियम 93 अन्वये त्यांनी दिलेल्या सूचनेवर उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी  या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी सीआयडी अंतर्गत एसआयटी स्थापन केली असल्याची माहिती दिली. त्यावर धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने त्याची न्यायलयीन चौकशी करावी अशी मागणी केली. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला बसणारे लाखो विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील काही दिवसांपासून सातत्याने आंदोलने करीत आहेत.

या आंदोलनाची दखल घेवून त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी ही मुंडे यांनी केली. यावर उत्तर देताना मदन येरावार यांनी या प्रकरणी 24 आरोपींना अटक केली आहे, या रॅकेटच्या माध्यमातुन नोकरीस लागलेल्या उमेदवारांवरही कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या पुढील काळात परीक्षेमध्ये डमी  उमेदवार बसवून हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी उपायोजना केल्या जात असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :धनंजय मुंडेमुंबई