Makar Sankranti 2018 : संस्कार संक्रांतीचा गोडवा घराचा !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:35 AM2018-01-13T04:35:46+5:302018-01-13T04:35:54+5:30

कृषिप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात पौष महिन्यात येणारा मकर संक्रांत हा इंग्रजी महिन्यानुसार वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते.

Makar Sankranti 2018: Sanskar Sankranti's Sweet Home !!! | Makar Sankranti 2018 : संस्कार संक्रांतीचा गोडवा घराचा !!!

Makar Sankranti 2018 : संस्कार संक्रांतीचा गोडवा घराचा !!!

Next

- रवि सपकाळे

कृषिप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात पौष महिन्यात येणारा मकर संक्रांत हा इंग्रजी महिन्यानुसार वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते.
त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, असे मानण्यात येते.

महाराष्ट्रात हा सण तर तीन दिवस साजरा करतात. त्याला अनुक्रमे भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीमध्ये आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तीळगूळ आणि स्त्रियांना वाण वाटून परस्पर स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ अशी शुभकामना देण्यात येते. लग्न झालेल्या स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. या दिवसांत शेतात आणि मळ्यात आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हा कालावधी थंडीच्या दिवसांचा असल्यामुळे उष्ण असलेल्या तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक समजले जाते. गुजरातमध्ये मकर संक्र ांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहान-थोरांपर्यंत सर्व जण पतंग उडवतात. हा ‘पतंगोत्सव’ पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक तिथे भेट देत असतात.
तर या अशा पौराणिक महत्त्व असलेल्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी येणाºया सर्वांचे स्वागत करण्यासाठी तयार राहू या! आणि आलेल्या सर्वांचे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेने, उत्साहाने आणि प्रेमळ गोडव्याने स्वागतासाठी सुसज्ज होऊ या. मकर संक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून एकोपा वाढविण्यासाठी साजरा करतात, नकारात्मक दृष्टिकोनामधून सकारात्मक दृष्टिकोनामध्ये घेऊन जाणारा सण आहे. एकमेकांना तीळगूळ देऊन मुखाचा आणि नात्याचा गोडवा जितका वाढविता येईल तितका वाढवा. तेव्हा सर्वांनी या दृष्टीनेच सण साजरा करावा, म्हणून सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! ‘‘तीळगूळ खा नि गोड गोड बोला.’’

रांगोळी
आपल्या दारासमोर सणाला साजेशी रांगोळी काढणे, ही भारतातील प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे, रांगोळी म्हणजे आपला उत्सव, आनंद आणि भावना व्यक्त करण्याची एक कला आहे. रांगोळी ही सजावट आणि सुमंगलाचे प्रतीक आहे. हल्ली तर नेहमीच्या रांगोळीऐवजी क्रि स्टल रांगोळी किंवा वेगवेगळ्या फुलांची देखील रांगोळी काढणे ट्रेंडमध्ये आहे.

पॉटपौर्री
पॉटपौर्री म्हणजे आपल्या सभोवतालची हवा सुगंधित राहावी, यासाठी विविध फुलांची विशेषत: गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वाळवून ज्या भांड्यामध्ये ठेवलेल्या असतात ते भांडे. फुलांचा सुगंध निश्चितच तुमचा मुड रीफ्रे श करतो आणि त्यामुळे तुम्ही सणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
घरात लाइट गेल्यावरच मेणबत्ती लावावी, अशी आता परिस्थिती नाहीये. काही काही मेणबत्या तर खास विशेष प्रसंगासाठीच बनविण्यात येतात, विविध आकार आणि विविध रंगांत आज मेणबत्त्या उपलब्ध आहेत. सणासुदीच्या दिवसांत अशा विविध प्रकारच्या मेणबत्त्यांच्या सजावटीकरिता उपयोग करता येईल. जसे, सुहासिक मेणबत्ती, एरोमेटिक किंवा फ्लोटिंग मेणबत्ती इत्यादी...

मेणबत्तीसोबत आता विविध आकारांच्या, दर्जाच्या आणि वेगवेगळ्या ढंगातील कँ डल होल्डर यांचादेखील घरातील सजावटीकरिता मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.

Web Title: Makar Sankranti 2018: Sanskar Sankranti's Sweet Home !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.